
जळगाव : प्रतिनिधी
कंपनीत कामगारांना रोजंदारीने लावून त्याच्या मोबदल्यात प्रति कामगार दीडशे रुपये कमिशन देण्याचे व बनावट हिशोब दाखवून मोठा नफा मिळवून देतो. असे अषिष दाखवून योगिता शाम देवरे (वय ४७, रा. शिंदे नगर, पिंप्राळा) या महिलेची त्याच्या दीराचा शालक महेंद्र उर्फ मनोज बाळकृष्ण सोनार (रा. जळगाव) याने ७६ लाख ७७ हजार रुपयात फसवणुक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२२ ते दि. ३० एप्रिल २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरात योगिता देवरे या वास्तव्यास असून त्यांचा सख्खा चुलत दिराचे शालक मनोज उर्फ महेंद्र सोनार हे एका कंपनीत रंगकाम करीत होते. त्यानंतर चार ते पाच वर्षापुर्वी ते जैन ग्लोबल या कंपनीत काम करीत होता. त्यावेळेस त्याने माझ्या कंपनीत वॉशिंग व स्प्रे कलरिंगसाठी कामगार पुरविण्याचे काम घेतल्याचे त्याने देवरे यांना सांगितले. कामगारांना सहाशे रुपये रोजाने ठरवून त्यांना आपल्याकडून पैसे पुरवावे लागतात. त्यानंतर कंपनीकडून त्यांना ७८० रुपये प्रति कामगार इतका मोबदला मिळतो असे सागत योगिता देवरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार देवरे यांनी मुलगा व पतीसोबत चर्चा करुन दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी महेंद्र सोनार याला १ लाख ५६ हजार रुपये दिले होते. तेव्हापासून त्याचे देवरे यांच्या घरी नेहमी येणेजाणे सुरु झाले.
पहिल्या महिन्यात महेंद्र सोनार याने योगिता देवरे यांना नफ्याचे ४६ हजार ८०० रुपये परत दिले. त्यामुळे त्यांचा महेंद्रवरील विश्वास अधिकच वाढल्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे अधिक गुंतवणुक करण्यास तयार झाल्याने त्याने वेळोवेळी देवरे यांच्याकडून ५६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह ऑनलाईन व आरटीजीएसद्वारे त्याची पत्नी व मुलाच खात्यावर ७६ लाख ७७हजार रुपये स्विकारले.
गुंतवणुकीसाठी उसनवारीने व कर्जाचे पैसे भरण्याकरीता योगिता देवरे यांनी महेंद्र सोनार याच्याकडे पैशांची मागणी केली असत, त्याने विविध कारणे देवून त्यानंतर उसनवारी व कर्जाचे पैसे भरण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला असता सोनार वेगवेगळे कारणे देत होता. पैशांच्या मोबदल्यात महेंद्र सोनार याने महिलेला धनादेश दिले, मात्र ते वटले नाही. तसेच त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने ‘माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेईल’, अशी धमकी देत होता. सदर व्यक्तीने अशाच प्रकारे सोनार याने रविंद्र मुरलीधर अवचार व महेश निवृत्त पाटील या दोघांचीही फसवणूक केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने महिलेने २१ ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून महेंद्र सोनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.



