Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!
    क्राईम

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    editor deskBy editor deskAugust 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाच्या नावाखाली इतरांच्या बँक खात्यावर सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल २ कोटी १५ लाख ३९ हजार २३० रुपये स्वीकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करण भारत सांखला उर्फ सैनी (३१, रा. रायसोनी नगर, जळगाव, मूळ रा. मेढता सिटी, जि. नागौर, राजस्थान) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ९ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार,  सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करत ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारतात व नंतर काढून घेतात. अशी संशयास्पद रक्कम आलेले खाते होल्ड केले जातात. अशाच प्रकारे जळगावातील दोन जणांची बैंक खाती होल्ड झाल्याने त्यांनी २० ऑगस्ट रोजी सायबर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे आढळले. त्यासंदर्भात पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता करण सांखला याने दूर अॅड ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी हे बँक खाते वापरण्यासाठी मागितले होते, अशी माहिती पोलिसांना दिली. सांखला याने सायबर फसवणुकीची ही रक्कम सदर खात्यांवर स्वीकारल्याचे समोर आले. इतकेच नव्हे, सांखला हा एजंट म्हणून काम करत असल्याचेही समोर आले आहे.

    सायबर पोलिसांनी करण सांखला याच्याकडे चौकशी केली असता तो अशी बँक खाती घेऊन मुंबई येथील टोनी नामक व्यक्तीला देत असे व एका खात्याचा मोबदला म्हणून ४० हजार रुपये घेत होता. त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यातील ११ बँक खाती टोनी याला दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रमोद वाडिले यांनी फिर्याद दिली. त्यावरून करण सांखला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026

    बांभोरी पुलाजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; योगेश महाजन ठार

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.