Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चहाच्या टपरीवर धक्कादायक प्रकार : जाब विचारताच चौघांनी पतीला मारहाण; विवाहितेचा विनयभंग !
    क्राईम

    चहाच्या टपरीवर धक्कादायक प्रकार : जाब विचारताच चौघांनी पतीला मारहाण; विवाहितेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskAugust 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    चहा पित असलेल्या पत्नीकडे वाईट नजरेने बघणाऱ्यास जाब विचारला असता, त्याचा राग आल्याने चौघांनी २७ वर्षीय विवाहितेसोबत अश्लिलकृत्य करीत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारहाण देखील केली. ही घटना दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगरकडून कानळद्याकडे जाणाऱ्या चहाच्या दुकानावर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाकडून कानळद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चहाच्या दुकानावर २७ वर्षीय महिला दि. १६ ऑगस्ट रोजी तिच्या पतीसह चहा पिण्यासाठी आली होती. चहा पित असतांना त्याठिकाणी उभा असलेला एक जण महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. तिच्या पतीने तु माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का बघतोय असे विचारले. त्याचा राग आल्याने त्या व्यक्तीने महिलेच्या पतीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.

    त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या अन्य तिघ देखील मारहाण करीत असतांना त्यातील एकाने विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. दरम्यान, दि. १८ ऑगस्ट रोजी विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोहेकॉ उषा सोनवणे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर : ‘बड्या’ संस्थाचालकांनाही चौकशीच्या कक्षेत आणा; जळगावात संशयित कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणीनंतरच !

    August 20, 2026

    ‘रशियन कंपनी’चा बनाव, डॉलर-युरो ट्रेडिंगचे आमिष; वकिलाला लाखोंचा गंडा

    August 20, 2026

    सांडपाण्याचा जाब विचारताच संताप : लोखंडी रॉडने महिलेच्या डोक्यात घाव; तांबापुऱ्यात चौघांविरुद्ध गुन्हा !

    August 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.