Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मेहरूण तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर; १६ ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढणार
    जळगाव

    मेहरूण तलाव प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडवर; १६ ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढणार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 12, 2026Updated:August 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १६ ड्रेनेजचे सांडपाणी तलावात जाण्याचा प्रश्न; गणेश विसर्जनापूर्वी दोन पंप हाऊस सुरू करण्याच्या सूचना

    विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहराचे वैभव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तलावात शहरातील गटारीचे सांडपाणी जाणार नाही, यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

    उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक नितीन सपके, नगरसेवक अमर जैन आणि नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

    मेहरूण तलावात एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ड्रेनेजचे सांडपाणी सोडले जात असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे ही समस्या तात्पुरती न सोडवता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आगामी गणेश विसर्जनापूर्वी दोन पंप हाऊस तातडीने सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले.

    यावेळी संबंधित ठेकेदाराने सांडपाण्याचा प्रवाह तलावात जाण्यापासून रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची ब्ल्यू प्रिंट सादर केली. सांडपाण्याचा प्रवाह अडविणे, आवश्यक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करणे तसेच तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांची माहिती बैठकीत देण्यात आली.

    मेहरूण तलावात गटारीचे पाणी जाणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, सभापती आणि उपस्थित नगरसेवकांनी व्यक्त केली. तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय गंभीर असल्याने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली.

    ठेकेदाराने कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, तसेच कामाची गुणवत्ता, नियोजनानुसार अंमलबजावणी आणि काम वेळेत पूर्ण होते की नाही, यावर महापालिका प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या.

    “मेहरूण तलावाचे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यामुळे कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्षात परिणाम दिसला पाहिजे. गटारीचे पाणी तलावात जाणार नाही, याची ठोस व्यवस्था तातडीने झाली पाहिजे. याबाबत आयुक्तांशीही चर्चा करणार आहे,” असे उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी सांगितले.

    मेहरूण तलावाचे प्रदूषण रोखून हा जलस्रोत स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात ‘तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

    August 12, 2026

    जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

    August 12, 2026

    धरणगाव येथे १४ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.