Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन वर्षांपासून थकीत मानधनासाठी पीक पाहणी सहाय्यकांचे तहसीलदारांना निवेदन
    धरणगाव

    तीन वर्षांपासून थकीत मानधनासाठी पीक पाहणी सहाय्यकांचे तहसीलदारांना निवेदन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 12, 2026Updated:August 12, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email



    धरणगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात पीक पाहणीचे काम करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील पीक पाहणी सहाय्यकांनी थकीत मानधन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर केले.

    मागील तीन वर्षांपासून पीक पाहणीचे काम करूनही मानधन थकीत असल्याने सहाय्यकांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी मानधन नियमित मिळावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

    याशिवाय नैसर्गिक आपत्ती तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून सुरक्षा कवच मिळावे, सर्व पीक पाहणी सहाय्यकांना शासकीय ओळखपत्र देण्यात यावे, शेतातील पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र मिळण्याबाबत शासन स्तरावरून स्पष्ट आदेश काढण्यात यावेत, पीक पाहणीसाठी 5G मोबाईल उपलब्ध करून द्यावा आणि सर्व सहाय्यकांना विमाकवच लागू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

    या मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनावर तालुक्यातील सर्व पीक पाहणी सहाय्यकांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन सादर करताना तालुक्यातील सर्व सहाय्यक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव येथे १४ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

    August 12, 2026

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    तरडे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी रंजनाबाई नंदलाल पाटील यांची बिनविरोध निवड

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.