Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग न्यूज: अंजनी धरणातून कधीही पाणी सोडले जाणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
    एरंडोल

    ब्रेकिंग न्यूज: अंजनी धरणातून कधीही पाणी सोडले जाणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 31, 2026Updated:July 31, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल | प्रतिनिधी : अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अंजनी धरणातून कोणत्याही वेळी अंजनी नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडण्यात येऊ शकते, असा इशारा पाटबंधारे उपविभाग, एरंडोल यांनी दिला आहे.

    याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत सरपंच, पोलिस पाटील आणि नदीकाठच्या गावांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

    पत्रानुसार, धरणातील आवक लक्षात घेऊन कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे अंजनी नदीकाठील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व मालमत्ता सुरक्षित ठिकाणी हलवावी आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    तसेच संबंधित गावांनी दवंडी देऊन नागरिकांना तातडीने सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव–एरंडोल रस्ता धुळीत गाडला; हजारो नागरिकांचा जीव धोक्यात!

    March 4, 2026

    धुळे एसीबीची कारवाई : ३ हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अटकेत !

    October 17, 2025

    निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

    June 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.