Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरातींवर अखेर मनपाची कारवाई
    Uncategorized

    भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरातींवर अखेर मनपाची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2026Updated:July 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी
    जळगाव शहरातील दुभाजकांवर (डिव्हायडर) लावण्यात आलेल्या भंगाळे गोल्डच्या नियमबाह्य जाहिरात फलकांवर अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधित फलक हटवले. सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

    महानगरपालिकेने शहरातील विविध दुभाजक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि उद्योजकांना निश्चित अटी व शर्तींवर विकसित करण्यासाठी दिले होते. या करारानुसार जाहिरात फलकांमध्ये किमान १० मीटरचे अंतर ठेवणे, फलकांवर ४० टक्के जागा मनपाच्या जनजागृती व सार्वजनिक हिताच्या जाहिरातींसाठी राखीव ठेवणे आणि उर्वरित ६० टक्के जागेवर संबंधित संस्थेची किंवा व्यावसायिकांची जाहिरात करण्याची अट होती. तसेच सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर जाहिरात फलक लावण्यापूर्वी मनपाची ‘ना हरकत’ (NOC) घेणेही बंधनकारक करण्यात आले होते.

    मात्र, संबंधितांनी या अटींचे उल्लंघन करत १० मीटर अंतराचा नियम न पाळता फलक उभारले. तसेच १०० टक्के जागेवर स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला होता.

    याप्रकरणी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २४ जुलै २०२६ रोजी उपायुक्तांनी संबंधितांना स्वतःहून जाहिरात फलक हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने संबंधित फलक हटविण्याची कारवाई केली.

    नव्या आयुक्तांच्या कारवाईचे स्वागत

    या कारवाईनंतर ॲड. पियुष पाटील यांनी नव्याने रुजू झालेल्या महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे स्वागत केले. जळगाव शहरात अनधिकृत जाहिराती, मोठे फलक आणि डिव्हायडरच्या नावाखाली झालेल्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “आयुक्तांनी अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने कारवाई केली असून त्यांचे अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    १६० कोटींच्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षणाधिकारी अटकेत; SITच्या तपासाला मोठे यश

    July 28, 2026

    शालार्थ आयडी घोटाळा; मास्टरमाईंड मनोज अडचणीत, कारवाईचे संकेत

    July 28, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.