जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेचा धक्का लागून सुभाष सीताराम महाजन (४७, रा. हरिविठ्ठल नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १२ जुलै रोजी शहरातील खंडेराव नगर जवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव ते शिरसोली दरम्यान खंडेरावनगर जवळील खांबा क्रमांक ४१६/९ ते ४१६/११ दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळावर असल्याची माहिती उप स्टेशन प्रबंधकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ जितेंद्र राठोड हे घटनास्थळी पोहचले. काही वेळानंतर मयताचे नातेवाईकही तेथे आले व त्यांनी ओळख पटविली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जितेंद्र राठोड करीत आहेत.



