Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळ पोलिसांचा दणका! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; ६ चोरीच्या दुचाकी जप्त
    क्राईम

    भुसावळ पोलिसांचा दणका! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद; ६ चोरीच्या दुचाकी जप्त

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 9, 2026Updated:July 12, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज

    भुसावळ शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर मोठी कारवाई करत एका सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे भुसावळ, जामनेर, अमळनेर आणि चोपडा परिसरातील मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

    २३ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ येथील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंगमधून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी विजय जगन्नाथ खडके यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

    तपासादरम्यान डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहेनवाल आणि पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी चोपडा बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

    चौकशीत आरोपीने आपले नाव विशाल राजेंद्र राठोड (वय ४६, रा. भीकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने भुसावळ, जामनेर आणि अमळनेर परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

    पोलिसांनी आरोपीकडून एकूण सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून, आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान, पोलीस कॉन्स्टेबल सुबोध मोरे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनवणे आणि दीपक पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    या धडक कारवाईमुळे मोटारसायकल चोरट्यांमध्ये खळबळ उडाली असून, भुसावळ शहर पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अमळनेर हादरलं! खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात बुडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    July 7, 2026

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    July 4, 2026

    चोपड्यात जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिनसह तीन जण अटकेत, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

    July 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.