Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माऊली नगरात मध्यरात्री रक्तरंजित थरार : दोघांच्या छातीत चॉपर खुपसला; एकाचा मृत्यू, संशयित अटकेत !
    क्राईम

    माऊली नगरात मध्यरात्री रक्तरंजित थरार : दोघांच्या छातीत चॉपर खुपसला; एकाचा मृत्यू, संशयित अटकेत !

    editor deskBy editor deskOctober 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महिलांच्या अंगावर दुचाकीचा लाईट चमविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोघांवर धारदार चॉपर छातीत खुपसला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या किरण विठ्ठल पाटील (वय ४२, रा. माऊली नगर) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ४६) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. २० रोजी रात्री साडेआठ वाजता खेडी बु. येथील माऊली नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्रीच तपासचक्रे फिरवित संशयित मयुर चैत्रराम जाधव (रा. माऊली नगर) याला अटक केली आहे.

    शहरातील कालंका माता चौकात गॅरेज चालविणारे किशोर पाटील हे माऊली नगरात वास्तव्यास आहे. त्यांच्या घराशेजारी त्यांचा मित्र किरण विठ्ठल पाटील हे राहत असून ते सुप्रिम कंपनीत नोकरीस होते. दि. २० रोजी रात्रीच्या सुमारास ते घरी असतांना त्यांना गल्लीत आरडाओरड सुरु असल्याचे आवाज आला. त्यांनी तेथे जावून बघितले असता, त्यांना गल्लीतील महिला पुरुष यांचे त्याच परिसरात राहणाऱ्या मवुर जाधव हा त्यांच्यासोचत वाद घालीत असल्याचे दिसले. दरम्यान, किरण पाटील यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की, मयुर हा बऱ्याच वेळापासून दुचाकीवर बसून त्याचा लाईट महिलांच्या अंगावर मारत होता. त्याला याबाबत जाब विचारला असता, तो शिवीगाळ करीत वाद घातली होता.

    किरण पाटील यांच्यावर वार केल्यानंतर त्याला अडविण्यासठी किशोर पाटील हे गेले असता, संशयित मबुर जाधव याने तोच चॉपर किशोरच्या छातीत खुपसला. यामध्ये किशोर पाटील हे देखील गंभीर जखमी झाले. त्या दोघांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत किरण पाटील यांना मयत घोषीत केले, तर जखमी किशोर पाटील यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

    दोघांच्या छातीत चॉपर भोसकून खून केल्यानंतर संशयित मयुर जाधव हा त्याच्यासोबत असलेल्या रोहीत राजपूत व भरत सुतार यांच्यासह घटनास्थळहून पसार झाला, एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासचक्रे फिरवित काही वेळताच तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरुन मयुर चैत्रराम जाधव (रा. माऊली नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. त्याला बुधवार दि. २१ ऑक्टोंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २६ ऑक्टोंबर पर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील हे करीत आहे.

    ही कामगिरी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, पोहेकों रामकृष्ण पाटील, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, प्रदीप चौधरी, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, मोतीलाल बोरसे यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या : घुग्घुस आंदोलनाप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

    October 22, 2026

    गुजरातमधील तरुण गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसांसह चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात !

    October 22, 2026

    बनावट स्टॅम्प, बनावट गुणपत्रक अन् लाखोंचा व्यवहार : जळगावात तरुणाची फसवणूक !

    October 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.