Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू
    क्राईम

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 4, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील: जळगाव प्रतिनिधी
    जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मृत तरुणाचे नाव मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे आहे. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. मुस्तकीमच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. यावेळी मुस्तकीम इलेक्ट्रिक वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

    घटनेची माहिती मिळताच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली. मुस्तकीमच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

    प्राथमिक माहितीनुसार, मुस्तकीम गेल्या सुमारे वीस दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत होता. या घटनेबाबत अद्याप संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.