Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला
    क्राईम

    गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला

    editor deskBy editor deskJune 30, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    गावाकडून येणाऱ्या रस्त्याने न येता गिरणा नदीपात्राकडून येऊन चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीच चोरून नेली. त्यानंतर काही अंतरावर ती फोडून त्यातील ५५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना २७ जून रोजी आमोदा, ता. जळगाव येथील एकवीरा माता मंदिरात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील आमोदा येथे एकवीरा मातेचे मंदिर असून याठिकाणी असलेल्या दानपेटीत अनेक दिवसांपासूनची रक्कम जमा झाली होती. २७ जून रोजी मध्यरात्री चोरटे गावाकडून येणाऱ्या रस्त्याने न येता मंदिराच्या मागे असलेल्या गिरणा नदी पात्राकडून येणाऱ्या रस्त्याने मंदिराजवळ पोहचले. त्यानंतर स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून ते मंदिरात उतरले. तेथून त्यांनी दानपेटीच उचलून नेली. त्यानंतर साधारण ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीजवळ नेऊन दानपेटी फोडली व त्यातील रोकड घेऊन चोरटे पसार झाले. पहाटे पुजारी पंजाबराव सूर्यवंशी हे मंदिरात आले तेव्हा ही घटना त्यांच्या लक्षात आली.

    त्यांनी मंदिराचे पदाधिकारी व ग्रामस्थांना कळविले. त्यावेळी या सर्व मंडळींसह तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. प्रवीण पाटील, दिनेश चव्हाण हे घटनास्थळी पोहचले. काही अंतरावर रिकामी दानपेटी आढळली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात दोन चोरटे नदी पात्राकडून मंदिरात आल्याचे व दानपेटी घेऊन गेल्याचे दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    चिंचोलीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    जामनेर तालुका हादरला : महिलेवर सामूहिक अत्याचार ; १४ अटकेत !

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.