Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा
    क्राईम

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    editor deskBy editor deskJune 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तक्रारदाराचा विश्वास संपादन करत नफ्याचे अमिष दाखवित 30 वषय तरुणाला सायबर ठगाने 97 लाख 50 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तक्रारीनुसार याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    तक्रारदार तरुण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असुन खाजगी नोकरीनिमित्त ते भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी दि.२५ जून रोजी वेळोवेळी विलास पाटील नाव सांगणारा मोबाईल धारक याने तरुणाशी संपर्क साधला. मोबाइल क्रमांकावर नाव व फोटो लावुन त्याने तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. नफ्याचा गुंतवणूक फंडा सांगत त्याने तक्रारदार यांच्याकडून तब्बल ९७ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. त्यानंतर तक्रारदार यांनी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मुळ रक्कमही मिळाली नाही. फसवणूक केल्याची खात्री झाल्याने तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात कैफियत मांडली. त्यानुसार संशयिताविरोधात ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर हे तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026

    जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.