Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskJune 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा : प्रतिनिधी 

    तालुक्यातील संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे पुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील डॉ. समाधान पाटील आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी संबंधित हॉस्पिटलमध्ये दोघांमध्ये वाद उफाळल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी रवींद्र महाजन यांची डॉक्टरांसोबत झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ पोस्ट केल्याचेही सांगितले आहे. यानंतर रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाची प्राथमिक नोंद भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर संबंधित परिसर हा चाळीसगाव रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्या हद्दीत येत असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये, माझ्या आत्महत्येस डॉ. समाधान पाटील जबाबदार आहेत, असा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांसह समाजबांधवांकडून करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळतात नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाऱ्यात गर्दी केली होती.

    शहरातील डॉ. समाधान पाटील व मयत रवी महाजन यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच डॉ. समाधान पाटील व रवी महाजन यांच्यात २६ जूनला रात्री हाणामारी झाली होती. या हाणामारीत डॉ. समाधान पाटील हे जखमी झालेत. तर, घटनेनंतर रवी महाजन यांनी थेट नगरदेवळा रेल्वे स्थानक गाठत मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून नगरदेवळा ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे (कि.मी. खंबा क्र. ३५४/१०/१२) नजीक धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकुन देत आत्महत्या केली. व्हिडिओच्या आधारे पाचोरा पोलिस ठाण्यात डॉ. समाधान पाटील यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

     

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.