Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !
    जळगाव

    जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

    editor deskBy editor deskJune 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले.

    या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली.

    मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विजयी उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर कब्जा !

    June 22, 2026

    जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    June 22, 2026

    महायुतीचा विजयाचा जल्लोष; नंदकिशोर महाजन विधान परिषदेत

    June 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.