Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !
    क्राईम

    पहाटेचा पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ऑपरेशन ड्रॉप केसमध्ये ८ आरोपी जेरबंद, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    editor deskBy editor deskJune 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव | प्रतिनिधी

    जिल्ह्यात वाढत्या गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील कुप्रसिद्ध गावांवर मोठी धडक कारवाई करत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबविले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत विविध गुन्ह्यांतील ८ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालमोटा, हलवेडा, मथापुरी, जोहेलखेडा आणि चारठाणा ही गावे गेल्या काही वर्षांपासून विविध फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू, खजिना, जुन्या नाण्यांचा व्यापार, काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सापाचे विष यांसारख्या वस्तूंचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.

    पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ टाकून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत. त्यानंतर खरेदीदारांना गावात बोलावून बनावट वस्तू दाखविल्या जात. अनेक वेळा पैसे घेऊन वस्तू न देता फसवणूक केली जात होती. विरोध करणाऱ्यांना मारहाण किंवा खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा प्रकारांना पोलिसांनी ‘ड्रॉप केस’ असे नाव दिले आहे. कारवाईदरम्यान दोन आरोपींकडून अवैध शस्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. एका आरोपीकडून लोखंडी रिव्हॉल्व्हर व सहा जिवंत काडतुसे, तर दुसऱ्याकडून लोखंडी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि बनावट चलन जप्त करण्यात आले.

    पोलिसांनी दोन संशयितांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. यामध्ये सुमारे २० लाख रुपयांची रोकड, ३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ८ लाख रुपयांचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या मोहिमेत वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून हरण, काळवीट आणि सशाचे शिंगे व अवशेष जप्त करण्यात आले. कारवाईत चारचाकी व दुचाकी मिळून १४ वाहने तसेच ३० मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. याशिवाय चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यांतील फरार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात गेल्या तीन वर्षांत १० दरोडे, १ खुनासह दरोडा, १ खून, ७ जबरी चोरी, १६ फसवणुकीचे गुन्हे, १ दरोड्याचा प्रयत्न आणि २ सरकारी नोकरांवर हल्ल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.

    या विशेष मोहिमेत उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे २०० पोलिसांचा सहभाग होता. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर निर्णायक प्रहार करण्यासाठी भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तणाव; तरुणांवर जीवघेणा हल्ला

    June 19, 2026

    मुंबईत जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबादवर शोककळा

    June 19, 2026

    कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला मध्यरात्री आग; घातपाताचा संशय, अज्ञातांविरुद्ध गुन्हा !

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.