जळगाव : प्रतिनिधी
दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे ज्योती प्रताप चौधरी (वय ५२, रा. शंकरराव नगर) यांच्यासह दोघांना लाकडी मोगरीने मारहाण केली. ही घटना दि. ६ जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शंकरराव नगरात घडली. यापक्ररणी संशयित निशांत प्रताप चौधरी (वय २२, रा. शंकरराव नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शंकरराव नगरात राहणाऱ्या ज्योती चौधरी यांना दि. ५ जून रोजी रात्री निशांत प्रताप चौधरी हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगावळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्या हातात असलेली लाकडी मोगरीने ज्योती चौधरी यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. यावेळी त्यांचे वयोवृद्ध पती प्रताप चौधरी व आई कमलबाई चौधरी यांना देखील त्याने मारहाण करुन जखमी केले. दरम्यान, ज्योती चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित निशांत प्रताप चौधरी (वय २२, रा. शंकरराव नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



