धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एकलग्न येथील अशोक रतन पाटील (वय ७२) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील अशोक पाटील हे ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. या वेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, मयत अशोक पाटील हे शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मात निधनामुळे एकलग्न गावात शोककळा पसरली आहे. तर अशोक पाटील यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



