Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारूच्या नशेत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; सुरीच्या हल्ल्यात दोघे जखमी
    क्राईम

    दारूच्या नशेत घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; सुरीच्या हल्ल्यात दोघे जखमी

    editor deskBy editor deskOctober 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    फेकरी परिसरातील एका महिलेच्या घरात शिरुन त्यांचा विनयभंग, सुरीने हल्ला करुन सोन्याची चैन हिसकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर, महिलेच्या मदतीला धावलेल्या शेजाऱ्यावरही सुरीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देवेंद्र अशोक सरवटकर उर्फ डेव्हिड याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या आठ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तक्रारदार ३५ वर्षीय महिला या फेकरी परिसरात आपल्या सासू आणि दोन मुलांसह राहतात. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, २१ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता संशयित आरोपी दारूच्या नशेत महिलेच्या घराच्या गेटजवळ आला आणि अश्लील शिवीगाळ करू लागला. तर, सायंकाळी ७.३० वाजता संशयित धारदार सुरी घेऊन घरात शिरला व त्याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध केला, तर तिच्या सासूला ढकलून दिल्याचाही आरोप आहे.

    महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुरी फिरवली. यात महिलेच्या उजव्या हाताच्या अंगठ्‌याला आणि दंडाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावले. त्यांनी महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपीने त्यांच्यावरही सुरीने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात त्यांच्या गालालाही इजा झाली आहे. या घटनेदरम्यान महिलेच्या गळ्यातील अंदाजे दोन ग्रॅमची सोन्याची चैन बळजबरीने संशयिताने हिसकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भात आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तास भुसावळ तालुका पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पान-सिगारेट देण्यास नकार दिला अन् कोयता-तलवारीने हल्ला! जळगावात खळबळ; १२ तासांत तिघे अटकेत!

    October 24, 2026

    पारोळ्यात अपघाताची थरारक घटना : दुचाकीस्वाराचा मृत्यू, धडक देऊन चालक फरार

    October 24, 2026

    जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात! २९ नोव्हेंबरला मतदान; सर्वपक्षीय पॅनल की महायुती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    October 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.