Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर
    क्राईम

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    editor deskBy editor deskMay 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :  प्रतिनिधी

    येथील बाजारपेठ परिसरात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले (कट्टे) आणि एक धारदार गुप्ती जप्त केली. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री केली.

    पोलिसांना आलिशान वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत एक तरुण शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला असता संशयिताने पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. अटक केलेल्या तरुणाचे नाव भूषण शांताराम कोळी (वय १९, रा. पाडळसा, ता. यावल) असे आहे. त्याची झडती घेतली असता अंदाजे ५० हजारांचे दोन गावठी कट्टे, एक हजार रुपयांची गुप्ती तसेच २० हजारांचा आयफोन जप्त करण्यात आला. या प्रकरणी कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपीने शस्त्रे कुठून मिळवली, शहरात ती आणण्यामागचा उद्देश काय होता, तसेच त्याची पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरात तरुणांकडे वारंवार गावठी शस्त्रे आढळत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून यामागील साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026

    नंदुरबारच्या तरुणीवर जळगावात अत्याचाराचा प्रयत्न !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.