Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव
    क्राईम

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    editor deskBy editor deskMay 3, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शॉर्टसर्कीटमुळे चटई कंपनीच्या गोडावूनला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करीत आजूबाजूच्या तीन कंपन्यांना देखील विळख्यात घेतले. या आगीमुळे एका कंपनीतील पाच गॅस सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला होता. यामध्ये कंपनीत तयार झालेल्या मालासह मशिनरी जळून खाक झाले. आग ही चौथ्या कंपनी पर्यंत पोहचणार त्यापुर्वीच नियंत्रण मिळविल्यामुळे ती कंपनी सुरक्षीत राहीली. ज्याठिकाणी ही आग लागली त्याच्या समोर गॅस सिलींडरचे गोदाम आहे. आग लागल्यानंतर सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात खळबळ माजून गेली. परंतू कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत गॅस गोडावूनच्या बाहेर असलेल्या वाहने तात्काळ तेथून दूर अंतरावर नेवून उभी केली. ही घटना शनिवार दि. २ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जे सेक्टरमध्ये घडली. कंपन्यांना सुटी असल्यामुळे सुदैवाने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील जे ४० सेक्टरमध्ये दिग्विजय बनवट यांच्या मालकिची नवकार चटई नावाची कंपनी असून त्याच्या शेजारी त्यांनी भाडेतत्वावर तयार झालेला माल ठेवण्याकरीता गोदाम घेतले आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे गोदामाला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर आगीने शेजारी असलेल्या पावडर कोटींग करणाऱ्या कंपनीला आगीच्या विळख्यात घेतले. त्यामुळे याठिकाणी असलेले गॅस सिलींडरचा स्फोट झाला एकापाठोपाठ एक असे एकूण पाच सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे आगीच्या ज्वाला आणि धूराचे लोळ उंचच उंच आकाश उडत होते.

    जे बदर्स कंपनीच्या समोरच भारत गॅस कंपनीचे गोदाम असून याठिकाणी सीलीडरमध्ये गॅस भरला जातो, गॅस भरण्याकरीता कंपनीसमासेर पाच ते सहा वाहने उभी होती. आगी लागल्यानंतर सिलींडरचा स्फोट झाल्याचे सकजताच वाहन चालकांनी तात्काळ प्रसंगावधना राखत गॅस सीलींडर असलेली वाहने घटनास्थळापासून इतरत्र हलवली. गॅस प्लांटसमोरच ही आगीच्या ज्वाळा आकाशत उठत असल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026

    नंदुरबारच्या तरुणीवर जळगावात अत्याचाराचा प्रयत्न !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.