Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुतणीच्या लग्नाच्या दिवशीच काकांचे निधन; आनंदावर विरजण
    Uncategorized

    पुतणीच्या लग्नाच्या दिवशीच काकांचे निधन; आनंदावर विरजण

    editor deskBy editor deskMay 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी

    काळबांडे वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर प्रभाकर गव्हाणकर यांच्या मुलीचे लग्न निश्चीत झाले. दोन्ही घरात आनंदाचे वातावरण असताना लग्नाच्या दिवशीच दि. १ मे रोजी सकाळी मुलीचे काका सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार,  अनेक दिवसांपासून  गव्हाणकर परिवारात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी सदाशिव प्रभाकर गव्हाणकर (माळी) (५२) हे हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सदाशिव हे लवकर झोपी गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठलेच नाहीत.

    झोपेत हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. लग्न मंडपातील आनंदाचे वातावरण पूर्णपणे विरून गेले. लग्नाचाच दिवस असल्याने आधी मोजक्या मंडळीच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न लावण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तापी नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ शहरात शोककळा

    June 14, 2026

    उत्पन्न वाढवण्याच्या संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्याबाबतचा तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    June 12, 2026

    अखंड काँग्रेसची संकल्पना पुढे आणा; शरद पवारांनी पुढाकार घ्यावा – संजय राऊतांचे आवाहन

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.