Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवाजी नगरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती
    जळगाव

    शिवाजी नगरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक ५ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक निबंधकांना एक पत्र पाठवत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी तसेच त्यानंतर नियमानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.

    नविन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी घ्यावयाच्या निवडणूका ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दूध संघाबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार समितीमार्फत सदर तक्रारीची चौकशी सुरु आहे. अशा स्थितीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची वैधानिक मुदत समाप्त झाली असल्याने सदर संचालक मंडळ बरखास्त करुन नविन प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    March 26, 2026

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    सराईत गुन्हेगाराची दहशत अखेर उघड; पोलिसांनी काढली धिंड !

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.