Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !
    क्राईम

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    editor deskBy editor deskApril 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    कारमधून आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे शटरच्या कुलूप तोडून मेडीकलसह हार्डवेअरच्या दुकानातून रोकडसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिव्हीआर असा एकूण १२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नागरिकांसह पोलिसांनी चोरट्यांचा कारचा पाठलाग केला. मात्र चोरटे त्यांना गुंगारा देत पसार झाले. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिलपुरा पोलीस चौकीसमोर दिलीप अनंत वाणी यांचे पद्मालय मेडीकल नावाचे दुकान आहे. मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास एका लाल रंगाच्या कारमधून तीन चोरटे त्यांच्या दुकानासमोर आले. त्या चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या पट्टया कापून शटर उचकावून आत शिरले. त्यांनी दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली पाच हजारांची रोकडसह आईस्क्रीम व शितपेयाच्या बॉटल्स असा ऐवज चोरुन नेला. मेडीकलमध्ये चोरीकेल्यानंतर चोरटे असोदा रोडवरील श्रीराम चौकात आले. त्यांनी भुषण हुकुमचंद छाजेड (रा. बहिणाबाई कॉलनी) यांच्या मालकीच्या पुर्णा हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातून ५ हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरटे असोदा रेल्वे उड्डाणपुलारुन असोदा गावाच्या दिशेने पसार झाले. मेडीकलमध्ये चोरी केल्यानंतर चोरटे पळून जात असतांना हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती लागलीच एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीसांसह नागरिकांनी चोरट्यांच्या कारचा पाठलाग केला. मात्र चोरटे पोलिसांना चकवा देत पसार झाले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026

    पोलिस दलात ‘टाईम शिस्त’ लागू; उशिरा येणाऱ्यांवर धिवरेंचा कडक दणका!

    April 29, 2026

    धक्कादायक : दुचाकी अपघातात अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.