Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिस दलात ‘टाईम शिस्त’ लागू; उशिरा येणाऱ्यांवर धिवरेंचा कडक दणका!
    क्राईम

    पोलिस दलात ‘टाईम शिस्त’ लागू; उशिरा येणाऱ्यांवर धिवरेंचा कडक दणका!

    editor deskBy editor deskApril 29, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शिस्तीचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलात वेळेचे भान राखले जावे, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कडक पाऊल उचलत थेट उपस्थिती तपासणी केली. या तपासणीत उशिरा कामावर येणाऱ्या तब्बल ३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या पगार कपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर धिवरे यांनी कार्यालयीन शिस्तीवर विशेष भर दिला आहे. अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी विविध शाखांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबवली. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचारी निर्धारित वेळेनंतर कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले.

    या तपासणीत ३७ जण उशिरा आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धिवरे यांनी शाखानिहाय यादी तयार करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितांवर अर्धवेतनी रजेच्या स्वरूपात अर्ध्या दिवसाचा पगार कपात करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

    विशेष म्हणजे, या कारवाईत केवळ कर्मचारीच नव्हे तर एका शाखेचे विधी अधिकारीही उशिरा आल्याचे आढळून आले. त्यांनाही करारानुसार वेळेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    उशिरा येणाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक फौजदार आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक संख्या जिल्हा विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांची असल्याचे समोर आले आहे.

    शाखानिहाय उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : जिल्हा विशेष शाखा – १४  उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव – ७ बिनतारी संदेश शाखा – ५  अर्ज शाखा – ४ वाचक शाखा २ – २ नियंत्रण कक्ष – १ लेखा शाखा – १ सीडीआर – १  विभागीय चौकशी शाखा – १ सीसीटीएनएस – १  या कारवाईमुळे पोलिस दलात वेळेच्या शिस्तीबाबत स्पष्ट संदेश गेला असून, पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहाटेचा थरार : कारमधून आलेल्या चोरट्यांची धाड; दोन दुकानं फोडून पोलिसांना चकवा !

    April 29, 2026

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    April 29, 2026

    धक्कादायक : दुचाकी अपघातात अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.