Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई
    क्राईम

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    editor deskBy editor deskApril 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक शाखेकडून व्यापक अभियान राबविण्यात आले असून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि अवैध फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत एकूण १०० दुचाकींचे कर्कश सायलेन्सर जप्त करण्यात आले, तर २५० फॅन्सी नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेले सायलेन्सर आणि नंबर प्लेट आज रोड रोलरच्या सहाय्याने चेपून पूर्णतः निकामी करण्यात आले.

    वाहतूक शाखेच्या तपासणीदरम्यान असे निदर्शनास आले की अनेक दुचाकीस्वारांनी मूळ कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सायलेन्सरऐवजी बाहेरून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले होते. या सायलेन्सरमुळे स्थानिक रहिवासी, जेष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ध्वनीप्रदूषणामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली.

    याशिवाय, शहरात अवैधरित्या फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधातही मोहीम राबविण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २५० नंबर प्लेट जप्त करून त्यांचा नाश करण्यात आला.

    जळगाव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक महत्त्वाची ठरते. सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ९३९ अपघात झाले असून त्यापैकी ४५० प्राणांतिक अपघात होते. या अपघातांमध्ये सुमारे ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. या चिंताजनक आकडेवारीमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके स्थापन करण्यात आली असून विविध नियमभंगांवर कठोर कारवाई सुरू आहे. यामध्ये विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपल सीट, अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, बेफिकीर ड्रायव्हिंग, नो-पार्किंग उल्लंघन, अवैध प्रवासी वाहतूक, दारू पिऊन वाहन चालविणे, राँग साईड वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर तसेच कर्कश सायलेन्सर यांचा समावेश आहे.

    ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा ‘शून्य प्राणहानी’ जिल्हा करण्याच्या उद्देशाने रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून जनजागृती आणि कारवाई या दोन्ही आघाड्यांवर काम सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.