Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण
    क्राईम

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    editor deskBy editor deskApril 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे कुटुंबासह भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्याची देशभरात चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील उच्च पद भूषवलेल्या व्यक्तीच्या या भेटीमुळे विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

    ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील बागेश्वर धाम सध्या धार्मिक कार्यक्रम, दरबार आणि प्रवचनांमुळे चर्चेत आहे. भक्तांच्या समस्यांवर आध्यात्मिक उपाय सुचवण्याच्या त्यांच्या दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविक येथे आकर्षित होत असले तरी, त्यांच्या कथित चमत्कारांवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर समाजात सातत्याने चर्चा रंगताना दिसते.

    बागेश्वर धामच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी भूषण गवई यांनी पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई यांच्यासह येथे भेट दिली. त्यांनी बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.

    यानंतर गवई यांनी धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची भेट घेतली. या वेळी शास्त्री यांनी त्यांना बालाजी भगवानांचे पवित्र चित्र भेट म्हणून दिले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास आध्यात्मिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

    या भेटीदरम्यान गवई यांनी बागेश्वर धाममधील गुरुकुल तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांची माहिती घेतली आणि त्यांचे कौतुक केले. श्रद्धा आणि समाजसेवा यांचा समन्वय येथे दिसून येतो, असे त्यांनी नमूद केल्याचे सांगितले जाते.

    विशेष म्हणजे, ही त्यांची पहिलीच भेट नसून, पदावर असतानाही त्यांनी यापूर्वी अनेकदा बागेश्वर धामला भेट दिली आहे. यामुळे या स्थळाप्रती असलेली त्यांची श्रद्धा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

    दरम्यान, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अंधश्रद्धा संबंधित चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गवई यांच्या या भेटीकडे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026

    चिंचोलीत तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.