जळगाव : प्रतिनिधी
चिंचोली येथे ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील रहिवासी नीलेश अशोक बडगुजर (वय ३१) हा आपल्या आई सोबत एकटाच राहत होता. नीलेशची आई बाहेर शेजारी गेली असता नीलेश हा घरात एकटाच होता. याचवेळी त्याने घरातील लाकडी सरीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेशला मद्याचे व्यसन असल्याने तो नेहमी नशेत असायचा. त्यामुळेच त्याने मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. नीलेशच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे.
मयत नीलेशच्या पश्चात आई, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो मधूकर ओंकार बडगुजर यांचा पुतण्या तर दीपक बडगुजर, समाधान बडगुजर, अडावदच्या एचडीएफसी बॅकेचे कर्मचारी शाम बडगुजर यांचा चुलत बंधू होता. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पो नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी करत आहेत.



