Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यांचे श्रीकांत धिवरे नवे पोलीस अधीक्षक !
    क्राईम

    जळगाव जिल्ह्यांचे श्रीकांत धिवरे नवे पोलीस अधीक्षक !

    editor deskBy editor deskApril 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जळगाव जिल्ह्याची कमान श्रीकांत धिवरे सांभाळणार आहेत. डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी जळगाव पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील गुन्हेगारीवर मोठा अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. विशेषतः जिल्ह्यातील क्लिष्ट खून प्रकरणे आणि गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे आता जिल्ह्याचा पदभार स्वीकारतील. आगामी काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निर्माण केलेला गुन्हेगारीवरील वचक कायम ठेवण्यासाठी धिवरे यांना कशा प्रकारे पावले उचलावी लागतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, सातारा येथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून पुणे येथील पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर करण्यात आली आहे.

    कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून (तात्पुरत्या स्वरूपात) जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक एम. सेरा यांची पदोन्नतीसह पोलीस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली असून धुळेचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती जळगाव येथे करण्यात आली आहे. पुणे येथील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पावले उचलण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026

    अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

    April 21, 2026

    चोपडा हादरले : बेपत्ता तरुणाचा खून उघड; एक जेरबंद !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.