Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत
    क्राईम

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    editor deskBy editor deskApril 20, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे बसस्थानक परिसरात गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली. या कारवाईत आरोपीकडून बेकायदेशीर शस्त्र जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की, नशिराबाद बसस्टॅण्ड परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) हा सराईत आरोपी गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करीत फिरत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर नारखेडे यांनी आपल्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

    यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून सायंकाळी सुमारे ७.३० वाजता संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी आरोपी कमलाकर महाजन याला जागीच पकडण्यात आले. पंचांसमक्ष तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून लोखंडी चंदेरी रंगाचा व काळ्या प्लास्टिकच्या मुठीसह असलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला.

    सदर प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १२३/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख तसेच पोलीस कर्मचारी भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रविण लोहार आणि समीर सैय्यद यांनी ही यशस्वी कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    गावठी पिस्तूलसह दोन संशयित पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

    April 20, 2026

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.