Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बंद घराचे कुलूप चोरट्यांनी लांबविली लाखोंची रोकड !
    क्राईम

    बंद घराचे कुलूप चोरट्यांनी लांबविली लाखोंची रोकड !

    editor deskBy editor deskApril 17, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या c अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांच्या रोकडसह सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा खुर्द (विमानतळ जवळ) भागातील तारा बिझनेस पार्कमध्ये मोईज अब्बास बोहरा (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर ‘रुबी पेंट’ नावाची रंगाची फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते वास्तव्यास आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात रंगाचे आणि फर्निचरचे काम सुरू आहे. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा हे एकटेच दर्शनासाठी बऱ्हाणपूर येथील हकीमी दर्गा येथे गेले होते. त्यानंतर १३ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या कुटुंबालाही तेथे बोलावून घेतले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास संपूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून खासगी वाहनाने बऱ्हाणपूरकडे रवाना झाले.

    १५ एप्रिल रोजी पहाटे २:१५ वाजेच्या सुमारास बोहरा कुटुंब घरी परतले असता, घराच्या वरच्या मजल्याचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. दरवाजाचे कुलूप तुटलेले पाहून कुटुंबाला चोरीचा संशय आला. घरात प्रवेश केला असता, हॉलमधील तीन कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता, चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधून १० लाख १२ हजार रुपयांची रोकड, १० ग्रॅमचे सोन्याचे ब्रासलेट, २१ ग्रॅमच्या ५ अंगठ्या, २८ ग्रॅमच्या सोन्या-चांदीच्या बांगड्या असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घरात फर्निचरचे काम सुरू असल्याने आणि फॅक्टरीत अनेक मजूर कामाला असल्याने, ओळखीच्या व्यक्तीने पाळत ठेवून हे कृत्य केले असावे का..?, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी मोईज बोहरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026

    उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

    April 17, 2026

    एकरुखी शिवारात विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीटमुळे पिकांचे मोठे नुकसान !

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.