भुसावळ : प्रतिनिधी
राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे करून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले.
गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर अचूक नियोजन करत त्याला अटक करण्यात आली.
सादिक अली हा अनेक दिवसांपासून विविध जिल्ह्यांत फरार होता आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातही तो हवा होता. तपासात आरोपीने जळगाव जिल्ह्यासह वर्धा, बुलढाणा, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर येथे चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. दीर्घकाळ पोलिसांच्या शोधात असलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव अयमद खान बशीर खान (२९, रा. मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ), असे आहे. आरोपी मागील आठ वर्षांपासून फरार होता व विविध गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध सुरू होता. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली होती.



