Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कौटुंबिक वादातून पतीचा संताप अनावर; पत्नीची चाकूने हत्या !
    क्राईम

    कौटुंबिक वादातून पतीचा संताप अनावर; पत्नीची चाकूने हत्या !

    editor deskBy editor deskApril 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अकोला : वृत्तसंस्था 

    जिल्ह्यातील यावलखेड येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे.

    यावलखेड येथील गजानन नगर परिसरात राहणाऱ्या वृषाली अनिल निंबोकार (वय 32) यांचा पती अनिल निंबोकार (वय 42) याने चाकूने सपासप वार करत खून केला. वृषाली या गायत्री ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत काम करत होत्या. मागील दोन वर्षांपासून त्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होत्या.

    मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत. गुरुवारी सकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या दरम्यान अनिल निंबोकार मोठ्या मुलाला मारहाण करत होता. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वृषाली मध्ये पडल्या. यामुळे संतप्त झालेल्या अनिलने त्यांच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले.

    घटनेवेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. मात्र, घरातून आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी वृषाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या, तर आरोपीच्या हातात चाकू होता. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून साडीने बांधून ठेवले व त्याच्याकडील चाकू हिसकावून घेतला. जखमी अवस्थेतील वृषाली यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल निंबोकार याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खरीप हंगाम २०२६ नियोजन : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक !

    April 10, 2026

    खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

    April 10, 2026

    “धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास सत्ता जाईल” : करुणा मुंडे शर्मा यांचा महायुतीला थेट इशारा !

    April 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.