Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुसावळात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; तीन वाहनांसह एकाला अटक, एक फरार !
    क्राईम

    भुसावळात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; तीन वाहनांसह एकाला अटक, एक फरार !

    editor deskBy editor deskApril 7, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरातील इराणी मोहल्ला परिसरात लपवून ठेवलेल्या चोरीच्या तीन दुचाकी वाहनांचा संयुक्त पोलिस पथकाने पर्दाफाश करत सुमारे २ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.

    ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पथक इराणी मोहल्ला, रजा टॉवर परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका घराच्या आडोशाला संशयास्पद अवस्थेत उभ्या असलेल्या तीन मोटारसायकली आढळून आल्या. वाहनांच्या मालकांचा शोध घेतला असता कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी तिन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या.

    यानंतर या वाहनांची चेसिस व इंजिन क्रमांकाच्या आधारे तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान या तिन्ही दुचाकी अनुक्रमे मुक्ताईनगर, चोपडा शहर आणि तोफखाना (अहिल्यानगर) पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले.

    जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये पल्सर (एमएच-१९-ईएस-३५५५), पल्सर एन-१६० (एमएच-१९-ईटी-३३८०) आणि केटीएम ड्यूक २५० (एमएच-१६-डीटी-७४३३) या दुचाकींचा समावेश आहे.

    या प्रकरणी हसन अली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे. तर सलमान अली हुजूरअली इराणी हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दोघांनी मिळून दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवल्याची बाब तपासात उघड झाली आहे.

    ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पीएसआय रवि नरवाडे यांच्यासह पोलिस पथकातील अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, जप्त केलेल्या दुचाकींचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “डाऊनफॉल कोणाचा होईल ते वेळ ठरवेल”; नाना पटोले यांचा पार्थ पवार, राऊत आणि भाजपवर निशाणा !

    April 7, 2026

    कार-ट्रॅक्टर धडकेनंतर घडला अनपेक्षित प्रकार; चालकाने ट्रकसमोर घेतली उडी

    April 7, 2026

    गर्भवती विवाहितेचा गळा आवळून खून? जळगाव जिल्ह्यात खळबळ !

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.