Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्न’ की फसवणूक? अडीच लाख घेऊन नवरीचा पळ, दुसऱ्यासोबत विवाह
    क्राईम

    लग्न’ की फसवणूक? अडीच लाख घेऊन नवरीचा पळ, दुसऱ्यासोबत विवाह

    editor deskBy editor deskApril 6, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    लग्नासाठी पैसे घेतलेल्या पत्नीने आठच दिवसात पळ काढून पतीला तिघांनी फसवल्याचा गुन्हा दि.२ रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश रमेश शिरसाठ वय ३१ रा सानेनगर हल्ली नोकरी आडाजंग पाटीया सुरत याने विवाहासाठी चुंचाळे ता. चोपडा येथील आपल्या बहिणीच्या सासरे भिकन महादू पाटील यांच्या मध्यस्थीने दुर्गा गजानन थाटोड रा. गायेगाव ता अकोला हिच्याशी निश्चित झाला. त्यांनी अडीच लाख रुपये दुर्गा व तिची मावशी नंदा आणि त्यांच्यासोबत एक मध्यस्थी पुरुष यांना विवाहनिमित दिले. ठरल्याप्रमाणे दि.१० डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी कुलदेवता बीजासनी माता मंदिरमध्यप्रदेश येथे सध्या पद्धतीने विवाह लावला. दि.२२ डिसेंबर रोजी त्याची पत्नी सकाळी ७ वाजता पळून गेली होती. तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला. मुकेशने अडीच लाख रुपये परत मागितले असता तिने मला पैसेच मिळाले नाही असे सांगितले.

    दि.३० मार्च रोजी मुकेशला त्याची मैत्रीण सविता दीपक पाटील हिने फोन करून कळवले की, तूझी पत्न ी वाघळूद ता. धरणगाव येथील राकेश पाथरवट यांच्याशी लग्न करत आहे. तिने दुर्गाचे फोटो टाकल्याने त्याची खात्री झाली. तो पोलिसांच्या मदतीने दुर्गाला शोधायला वाघळूद येथे दि.३१ मार्च रोजी आला. तेव्हा दुर्गा आढळून आली नाही. दि २ एप्रिल रोजी दुर्गा आणि तिचा सध्याचा पती राकेश सुभाष पाथरवट हे दोघे अमळनेर पोलीस स्टेशनला आल्याचे समजले. म्हणून मुकेशच्या फिर्यादीवरून दुर्गा, तिची मावशी नंदा आणि अज्ञात पुरुष अशा तिघांविरुद्ध फसवणुकीचा उन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भोंदू अशोक खरात प्रकरणात निनावी पत्र; रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप !

    April 6, 2026

    अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, अत्याचाराचा गुन्हा !

    April 6, 2026

    मध्यरात्रीची संशयास्पद हालचाल उघड; पोलिसांनी दोन युवकांना पकडले!

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.