Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरफोडीचे सराईत गुन्हेगार गजाआड; शहर पोलिसांची कारवाई !
    क्राईम

    घरफोडीचे सराईत गुन्हेगार गजाआड; शहर पोलिसांची कारवाई !

    editor deskBy editor deskApril 2, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गेंदालाल मिल परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्हे शोध पथकाला कडक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी स.पो.नि. सुरेश आव्हाड, सफौ. सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाट, पोकों. अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांचे पथक तयार केले.

    गेंदालाल मिल परिसरात घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना पथकाला घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार रिक्षा स्टॉपजवळ थांबले असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ सापळा रचून संशयित आदील शेख मजीद, गुफरान शेख करीम, कासिम सैय्यद अली (सर्व रा. गेंदालाल मिल) यांना अटक केली. पोलिसांनी संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १० हजारांची रोकड, ४ चांदीच्या अंगठ्या, ३ चांदीचे पैंजण व १ सोन्याची अंगठी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव ट्रकने पिकअप उडवली, 8 महिला कामगार जागीच ठार

    April 2, 2026

    भरधाव रिक्षाची धडक अन् मागून दुसऱ्या दुचाकीची टक्कर; दुहेरी अपघातात तरुण जागीच ठार

    April 2, 2026

    ‘भाईगिरी’ची रील पडली महागात; पोलिसांचा धाक बसताच तरुणाची जाहीर माफी

    April 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.