जळगाव : प्रतिनिधी
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या उस्मान शहा इब्राहीम शहा (वय ५५, रा. न्यू ख्वॉजानगर पिंप्राळा हुडको) यांच्यासह त्यांना मुलगा व मुलीला तिघांनी लोखंडी पाईने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील न्यू ख्वॉजानगरात उस्मान शहा इब्राहीम शहा हे वास्तव्यास आहे. दि. २९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीचे संशयित आरिफ नादर शेख याच्याच्या मुलासोबत भांडण सुरु होते. उस्मान शहा व त्यांचा मुलगा हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता तिघांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत लोखंडी पाईने त्यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या जबाबावरुन संशयित आरिफ नादर शेख, जुबेर शेख व अन्य एका जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे



