जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईने गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. दोन्ही कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील न्यू ख्वॉजानगरात उस्मान शहा इब्राहीम शहा हे वास्तव्यास आहे. दि. २९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीचे संशयित आरिफ नादर शेख याच्याच्या मुलासोबत भांडण सुरु होते. उस्मान शहा व त्यांचा मुलगा हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता तिघांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत लोखंडी पाईने त्यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांनी दिलेल्या जबाबावरुन संशयित आरिफ नादर शेख, जुबेर शेख व अन्य एका जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.
दुसऱ्या कुटुंबातील जुबेर शेख हकीम (वय ३०, रा. पिंप्राळा हुडको) यांनी दिलेल्या तक्रारीीवरुन, उस्मान शेख हे दारुच्या नशेत जुबेर शेख यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत होते. त्या कारणावरुन चौघांनी त्यांना बेदम मारहाण करीत जुबेर शेख यांच्यासह त्यांचे मामा व जावई यांना जखमी केले. याप्रकरणी आरोफा शहा, शहनाद शहा, जाफर शहा, उस्मान शहा या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



