Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना समन्स बजावले; भोंदू खरात प्रकरणाची चौकशी सुरू
    क्राईम

    मोठी बातमी : रुपाली चाकणकरांना समन्स बजावले; भोंदू खरात प्रकरणाची चौकशी सुरू

    editor deskBy editor deskMarch 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी तयार केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. या समन्सनंतर रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी होईल, आणि त्यानंतर अटकेची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे.

    रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांमुळे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा दिला होता. या प्रकरणात शिवसेना उपनेते सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोलिसांशी भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

    टीव्ही 9च्या वृत्तानुसार, रुपाली चाकणकर यांना भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थान, मिरगाव या ट्रस्टवर सदस्य असल्यामुळे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी ट्रस्टच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी केली जाणार आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “समन्स बजावला आहे, म्हणजे काही आकाश कोसळले नाही; तो चौकशीचा भाग आहे.”

    राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर कायद्याने या प्रकरणात सहआरोपी आहेत. त्यांनी ट्रस्टवर होणारा प्रत्यक्ष हितसंबंध, पोलिसांवर टाकलेला दबाव आणि आयोगाच्या अध्यक्षा म्हणून सहभाग लक्षात घेतला पाहिजे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शीतला माता मंदिरातील अपघात: भक्तगणांच्या गर्दीत धक्काबुक्की ; ९ जणांचा मृत्यू !

    March 31, 2026

    लाडकी बहीण योजनेसाठी आज ‘लास्ट कॉल’; ई-केवायसी न केल्यास लाभ कायमचा बंद!

    March 31, 2026

    धक्कादायक : सप्तशृंगी पदयात्रेत काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय भाविकाचा मृत्यू

    March 31, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.