Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चुकून गोळी सुटल्याने अमळनेरात तरुण ठार !
    क्राईम

    चुकून गोळी सुटल्याने अमळनेरात तरुण ठार !

    editor deskBy editor deskMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    गावठी कट्टा हाताळताना चुकून गोळी सुटल्याने (मिस फायर) झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला. ही घटना अमळनेर येथील अमलेश्वर नगरात शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास घडली. अरुण सुरेश महाजन (३५) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

    गावठी कट्टा हाताळताना हा प्रकार झाल्याचे प्रथम दर्शनी समजते. जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह भेट दिली. जखमीस रुग्णालयात आणताच तिथे मोठी गर्दी उसळली होती. नेमका प्रकार काय घडला, याबाबत रात्री उशिरापर्यंत परिसरात चर्चा होती. दरम्यान अरुण महाजन याचा मंडपाचा व्यवसाय होता. त्याच्याकडे गावठी कट्टा कसा आला याचा पोलिस शोध घेत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    एलपीजी, पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक !

    March 28, 2026

    मुख्यमंत्री महाराष्ट्राला मूर्ख समजत आहेत का? सरोदेंचा गंभीर आरोप !

    March 28, 2026

    ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : ऋषीकेश वैद्यला अटक

    March 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.