Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !
    क्राईम

    जळगावात मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश :दोन आरोपी गजाआड !

    editor deskBy editor deskMarch 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील नविन बसस्टॅन्ड परिसरातून चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी यशस्वी तपास लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली होंडा कंपनीची ड्रीम मोटारसायकल (क्र. MH19 DA 5011) जप्त करण्यात आली आहे.

    या प्रकरणी दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे CCTNS No. 11/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

    तपासादरम्यान पोलिसांनी पथक तयार करून आरोपी क्र. 1) आकाश राजू खरे (रा. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव, सध्या राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव) व आरोपी क्र. 2) आकाश प्रकाश भिल (रा. कासमपुरा, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांना अटक केली. न्यायालयाकडून एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आरोपींची कसून चौकशी करण्यात आली.

    चौकशीत आरोपींनी जळगाव शहरातील भज्जी गल्ली परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीजबाबावरून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून ती गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील करत आहेत.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, मिलिंद सोनवणे, तुषार पाटील, विशाल साळुंके, गोविंद साबळे आणि जयेश मोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : चोरीच्या संशयावरून मुलींना उलटे टांगले; 10 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

    March 27, 2026

    बसस्थानकात ‘हातचलाखी’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हद्दपार आरोपी पुन्हा गुन्ह्यात

    March 27, 2026

    लॉकडाऊनच्या अफवा फेटाळल्या; केंद्राचा स्पष्ट इशारा :‘देश पूर्णपणे नियंत्रणात!’”

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.