रावेर : प्रतिनिधी
पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करताना चार जणांना रंगेहात पकडले असून, त्यांना मुद्देमालासह वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
आरोपी गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजाण मोरे (वय २१), सावन रणजित मोरे (वय २४, सर्व रा. मेंढागड, खरगोन), हेमराज होरपाल चव्हाण (वय २२, रा. मांडवखेडा, खरगोन) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला. पुढील चौकशीत पाल येथील व्यापारी यांचे अवैध गोडाऊनमध्ये धाडी टाकून धावडा, सलाई, कड प्रजातीचा एकूण ७ हजार ५०० किलो अंदाजित रक्कम १५ लाख रुपये किमतीचा डिंक जप्त करण्यात आला.
तसेच या कारवाईत शाईन कंपनीची गाडी (क्र. एमपी १० झेडए ८१४०), हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १९ एन ५३०८) वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई म उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहा वन संरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या पथकाने केली. यात वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी, रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीना तडवी, धनाबाई भादले, सविता बारेला, दीपक बारेला, मुकेश तडवी, आकाश बारेला, पो. कॉ. जगदीश पाटील, पो कॉ. ईश्वर चव्हाण यांनी केली. पोलीस निरीक्षक, रावेर डॉ. विशाल जयस्वाल यांची विशेष मदत लाभली.



