Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !
    राजकारण

    ‘गुपितं उघड करावी लागतील’ म्हणत राजकारणात खळबळ ;तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा !

    editor deskBy editor deskMarch 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार पलटवार करत खळबळजनक विधान केले आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडले, तेथून पोस्टमॉर्टमपर्यंतची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा थेट इशारा तटकरे यांनी दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

    यापूर्वी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी दावा केला होता की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवायचा होता. या आरोपांनंतर तटकरे यांनी आक्रमक भूमिका घेत आज पत्रकारांशी संवाद साधत रोहित पवारांवर निशाणा साधला.

    तटकरे म्हणाले, “२०१४ पासून माझ्यावर सातत्याने टीका होत आहे. मात्र, मी नेहमीच अजितदादांच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहिलो. पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्ही त्यांना साथ दिली. राज्याच्या राजकारणात अजितदादांनी निर्माण केलेल्या प्रभावात आमचाही वाटा आहे. मात्र, प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत.”

    यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे रोहित पवारांना इशारा देत गंभीर विधान केले. “अजित पवार यांच्या अपघातानंतर हॉस्पिटलपासून पोस्टमॉर्टमपर्यंत काय घडले, याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया मर्यादा पाळा, अन्यथा मला सर्व गोष्टी सार्वजनिक कराव्या लागतील,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

    तसेच, त्यांनी पवार कुटुंबीयांविरोधात कथित ‘कटकारस्थानां’चा उल्लेख करत, “सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात काय हालचाली सुरू होत्या, याची माहिती आमच्याकडे आहे. सुसंस्कृत राजकारण करायचे असेल तर संबंधितांनी याचा गांभीर्याने विचार करावा,” असेही नमूद केले.

    दरम्यान, या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर गेलेल्या या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात या प्रकरणाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मंत्री झिरवाळांचा ‘तो; व्हिडिओ व्हायरल : कारवाईची मागणी !

    March 26, 2026

    जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ? : पडळकरांचा खळबळजनक आरोप !

    March 25, 2026

    भोंदू खरात प्रकरण पेटले; “मोठ्या लोकांचा हात” : दमानिया यांचा गंभीर आरोप

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.