जळगाव : प्रतिनिधी
चोरी केल्याच्या संशयावरुन अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटीक (वय १९) याला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २४ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहराील उस्मानिया पार्कमध्ये हम्मीद अब्बास खाटीक हे वास्तव्यास असून त्यांचा मुलगा अबरार उर्फ चिरक्या खाटीक याने चोरी केल्याचा संशयावरुन दि. २४ रोजी संशयित सुपड्या, पंकज आणि किरण सपकाळे या तिघांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने व लोखंडी आसारीने उजव्या पायाच्या मांडीवर आणि कंबरेला मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, जखमीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ भिका खाटीक हे करीत आहे.



