भुसावळ : प्रतिनिधी
कंपनीत जात असताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन श्रीकांत सुरेश पवार (२८, रा. कुहे पानाचे, ता. भुसावळ) या कामगाराचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला मित्र आणि दुसऱ्या दुचाकीचा चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात २४ मार्च रोजी रात्री चिंचोली गावाजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुन्हे पानाचे येथील श्रीकांत पवार हे एका पाइप कंपनीत कामाला होते. २४ मार्च रोजी ते मित्राला सोबत घेऊन कंपनीत जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्रीकांत पवार यांना मयत घोषित केले. श्रीकांत यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच, कुटुंबीय व ग्रामस्थ रुग्णालयात पोहोचले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. या अपघाताने चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हिरावून घेतले आहे.



