जळगाव : प्रतिनिधी
कंपनीत जात असतांना दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात श्रीकांत सुरेश पवार (वय २८, रा. कुऱ्हपानाचे, ता. भुसावळ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत आणि धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालक गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार दि. २४ रोजी सायंकाळी ७ वाजता चिंचोली आणि उमाळा गावादरम्यान असलेल्या टेकडीजवळ घडली. जखमींवर खासगी रुगलयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हपानाचे गावात राहणारा श्रीकांत पवार हा तरुण उमाळा येथील एका पाईप कंपनीत कामाला होता. मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी तो मित्राला सोबत घेवून कंपनीत कामाला जाण्यासाठी निघाला. कंपनीत जात असतांना चिंचोली ते उमाळा गावाच्या मध्ये असलेल्या टेकडीजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत श्रीकांत हा गंभीर जखमी झाला.
दुचाकीस्वारांचा अपघातात ते गंभीर जखमी झाल्याचे समजाच नागरिकांनी तात्काळ जखमींना वाहनात टाकून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत श्रीकांत पवार याला मयत घोषीत केले. तर अन्य जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कामावर जाणाऱ्या श्रीकांत यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी श्रीकांत यांचा मृतदेह बघताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. श्रीकांत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. चिमुकल्य मुलीच्या डोक्यावरील पितृछ हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक् केली जात आहे.



