Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास
    क्राईम

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    editor deskBy editor deskMarch 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    शहरांमधील संताजी नगर भागात भरवस्तीत चोरट्यांनी दोन बंद घरांचे कडेकोंडे तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. २१ मार्चच्या रात्री ते २२ मार्चच्या सकाळच्या दरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील संताजी नगर (पटेल बेकरी समोर) भागात राहणाऱ्या तक्रारदार अरुणाबाई भाऊराव शिंदे (वय ६५) आणि त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या साक्षीदार उषाबाई ईश्वरलाल चौधरी हे दोघे बाहेरगावी गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. दि. २१ मार्च रोजी रात्री ११ वाजेपासून ते २२ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी या दोन्ही बंद घरांच्या दरवाजाचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील सुटकेस आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दोन्ही घरातून एकूण १,७८,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अरुणाबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ पवार करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या वादातून मित्राचा खून; रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव उघड !

    March 24, 2026

    किरकोळ कारणावरून संताप; आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर निर्घृण हल्ला !

    March 24, 2026

    जेलमधून बाहेर येताच दहशत : ‘जळगावचे डॉन’ म्हणत कोयत्यांसह घरात घुसून तोडफोड

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.