Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात
    क्राईम

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    editor deskBy editor deskMarch 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    शहरातील जुन्या पारोळा रस्त्यावर पोलिसांनी एका कारमधून १० पुडी अमली पदार्थ (ड्रग्स) हस्तगत केले आहे. या कारवाईत एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, तालुक्यात अमली पदार्थ हा पहिलाच प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा येथून एका कारमधून (एम.एच. ०१ बी.बी. २२१६) अमली पदार्थचा (ड्रग्स) साठा भडगावच्या दिशेने येत होता. या माहितीच्या आधारे भडगाव पोलिसांनी जुन्या पारोळा रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास संशयास्पद कार अडवून पोलिसांनी तिची कसून तपासणी केली असता, त्यात १० पुडी अमली पदार्थ एमडी ड्रग्स आढळून आले.

    पोलिसांनी तत्काळ कार आणि त्यातील आरोपी योगेश हरी चौधरी, सरगम हरी चौधरी रा. पारोळा, हल्ली मुक्काम भडगाव या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या अंमली पदार्थाची खातरजमा करण्यासाठी जळगाव येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भडगाव तालुक्यात प्रथमच अमली पदार्थ सारख्या घातक अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, यामागे आणखी कोणकोणते मोठे रॅकेट आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छोट्या भावाचा धाडसी निर्णय; भावजयीशी विवाह करून पुतण्यांना दिले वडिलांचे छत्र !

    March 23, 2026

    शिवसेना-भाजपमध्ये तणाव टोकाला, मंत्री-आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला !

    March 23, 2026

    भोंदू अशोक खरात प्रकरणातील मंत्र्यांना सहआरोपी करा ; वडेट्टीवार आक्रमक !

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.