Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारूच्या नशेत वाद : मोठ्या भावानेच लहान भावाला दगडाने ठेचून मारले!
    क्राईम

    दारूच्या नशेत वाद : मोठ्या भावानेच लहान भावाला दगडाने ठेचून मारले!

    editor deskBy editor deskMarch 22, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

    आई-वडीलांसह घरातील सदस्यांना नाहक त्रास देत असल्याच्या संतपातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ रोहन पानाचंद पाटील (वय २३, रा. नारोद, ता. चोपडा) याची दगडाने ठेचून हत्या केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविताच संशयित किरण पानाचंद पाटील (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील नारद येथील रहिवासी असलेला रोहन पाटील हा दि. २१ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नारोद येथील गूळ नदी पात्रात संशयास्पद स्थितीत मृत अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आला. यात मयत रोहन च्या डोक्याला, गळ्याला तसेच पायाला दुखापत झाल्याचे दिसून आले. गावकऱ्यांनी सदर घटना नारोद-खरदचे पोलीस पाटील विजय पाटील यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी अडावद पोलीस पोलिसांना सदर घटना कळवली. अडावद ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी भेट चोपडा डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटना स्थळी भेट दिली. मयताच्या अंगावर असलेल्या जखमांवरुन घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता. दरम्यान पोलिसांनी मयत रोहन याच्याबद्दल माहिती काढली असता त्याचे कौटुंबिक वाद असल्याचे समोर आले. आणि तोच धागा पकडत पोलिसांन तपासाची चक्रे फिरवली आणि घटनेच्या काही तासातच संशयितास अटक केली.

    मयत रोहन हा नशेच्या आहारी गेल्यामुळे तो आई वडीलांसह भावाला शिवीगाळ करीत होता. नशेत तो दररोज घरातील सदस्यांसोबत वाद घाली होता. त्यामुळे दररोजच्या वादाला घरातील सर्वचजण कंटाळले होते. शुक्रवारी रात्री ८ वाजता संशयित किरण याने लहान भाऊ रोहनला पाच हजार रुपये दिले होते, त्या पैशातून रोहन हा दारू पिला. त्यानंतर संधी साधत संशयित किरण याने गुळी नदीवरील केटीवेअरवरुन रोहनला ढकलून दिले. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर किरण याने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची निर्घण हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

    रोहनच्या अंगावरील जखमांवरुन त्याचा घातपात झाल्याचा संशयित स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांना होता. ते पथकासह नारोद येथे पोहचल्यानंतर त्यांनी मयत रोहनचा मोठा भाऊ किरण याला चौकशीसाठी बोलावले. त्यांनी किरणच्या चेहऱ्याला झालेल्या जखमा बघून चौकशी केली असता, तो उडवाउडीची उत्तरे देत होता. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने लहान भावाच्या हत्येची कबुली दिली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कालीचरण महाराजांचा धक्कादायक विधान : गुन्हे सिद्ध झाले तर भर चौकात गोळी मारली पाहिजे !

    March 22, 2026

    भुसावळ तालुक्यात प्रेमविवाहाच्या वादातून खळबळजनक हल्ला; पाच जण अटकेत

    March 22, 2026

    चोपड्यात मोठी कारवाई; १३ किलो गांजासह तिघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात!

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.