Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !
    क्राईम

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    editor deskBy editor deskMarch 20, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    भरदिवसा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपुड फेकून त्यांच्याजवळील ५ लाख २७ हजारांची बॅग लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार मनोज खुशाल उर्फ अशोक मोकळ (वय २६, रा. दंडेवाला नगर, मोहाडी, ता. धुळे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या अन्य दोघ साथीदारांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

    अमळनेर येथील लामा जिनिंगचे मालक यतीन विनोद कोठारी (वय ४८) हे दि. २५ फेब्रुवारी रोजी दुचाकीने जिनिंगमध्ये जात होते. पिंपळे रोडवर मोटारसायलवरुन आलेल्या तिघांनी त्यांना अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली, आणि त्याच्याजवळ असलेली ५ लाख २७हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून ते पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या पथकाने हा तपास सुरु आहे.

    तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर हा गुन्हा धुळे येथील सराईत गुन्हेगार मनोज उर्फ खुशाल मोकळ याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित मोकळ याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत दीड लाखांची रोकड काढून दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026

    वाळू माफियांचा धिंगाणा; महसूल पथकावर हल्ला, अधिकारी जखमी

    March 20, 2026

    अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपविले !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.